महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला ८ मार्च पर्यंत मुदतवाढ : आमदार कृष्णा गजबे यांच्या मागणीला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात पणन हंगाम २०२२-२३ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप हंगामातील धान खरेदीला २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान दिलेले उद्दिष्ट्य पुर्ण झाले नसल्याने विशेष बाब म्हणुन धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी ना. रविंद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनातुन केली असता त्या अनुषंगाने धान खरेदी करीता ८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याने आमदार गजबे यांचे शेतकरी वर्गातून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार कृष्णा गजबे यांनी १४ फेब्रुवारील ला दिलेले निवेदन व २४ फेब्रुवारी २०२३ रोजी केन्द्र शासनाचे अन्न, नागरी व पुरवठा मंञालयाला प्राप्त पञात नमुद करण्यात आले आहे की पणन हंगाम २०२२-२३ मधील किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत ३८ हजार ५९४ नोंदणीकृत शेतकऱ्यांकडुन धान खरेदी बाकी आहे. सदर शेतकऱ्यांकडुन धान खरेदी पुर्ण होण्यासाठी ५ लाख ४२ हजार ५०० क्विंटल चे वाढीव उद्दिष्ट वाढवून देण्याबाबत विनंती करण्यात आली होती.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असुन जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात दिलेल्या मुदतीत धान खरेदी पुर्ण होऊ न शकल्याने हजारो शेतकरी आधारभूत धान विक्री योजनेच्या लाभापासुन वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने १९ ऑक्टोबर २०२२ मध्ये नमुद केलेल्या अटी शर्थी कायम ठेऊन संबंधित अभिकर्ता संस्थेस यापूर्वी देण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्ये ५ लाख ४२ हजार ५००  क्विंटल इतके वाढीव धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात येत असुन खरेदीच्या उद्दिष्टानुसार ८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांनी संबंधितांना दिलेल्या पञाद्वारे कळविले आहे. रखडलेल्या धान खरेदीचा मार्ग मोकळा करुन देण्यात आमदार गजबे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos