महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (२ मार्च)

२ मार्च १८५५ : अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

२ मार्च १८५७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.

२ मार्च १९०३ : जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.

२ मार्च १९४६ : हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

२ मार्च १९४९ : न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.

२ मार्च १९५२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.

२ मार्च १९५६ : मोरोक्‍को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

२ मार्च १९६९ : जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.

२ मार्च १९७० : ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.

२ मार्च १९७८ : स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

२ मार्च १९९२ : आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.

२ मार्च २००१ : बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.

जन्म (२ मार्च)

२ मार्च १७४२ : नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

२ मार्च १९२५ : चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

२ मार्च १९३१ : सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.

२ मार्च १९३१ : मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.

२ मार्च १९७७ : इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.

मृत्यू (२ मार्च)

२ मार्च १५६८ : मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.

२ मार्च १७०० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)

२ मार्च १८३० : इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)

२ मार्च १९४९ : प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.

२ मार्च १९७६ : मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.

२ मार्च १९९४ : धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos