महत्वाच्या बातम्या

 नालीवरील अतिक्रमण भोवले : मोहुर्ली येथील प्रकरण


- ग्रा.प.सदस्य उर्मिला मडावी अपात्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मोहुर्ली येथील सदस्याने नालीवर केलेले अतिक्रमण अंगलट आले असून जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी ग्रामपंचायत सदस्य ऊर्मिला ढिवरु मडावी यांना पदावर राहण्यास अनर्ह ठरविले आहे.

ग्रामपंचायत सदस्य असलेल्या उर्मिला ढिवरु मडावी यांनी शासकीय नालीवर अतिक्रमण करून शौचालय व बाथरूमचे बांधकाम केले होते. याबाबत ग्रा.प.सदस्य मारोती आगरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (ज - ३) नुसार कारवाई करण्याची मागणी केली होती.

जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजताच कारवाई पासून वाचण्यासाठी उर्मिला मडावी यांनी जेसीबी लावून शौचालय व बाथरूमचा खालचा भाग पाडून टाकला होता. मात्र चौकशी दरम्यान उर्मिला मडावी यांनी शासकीय नालीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी त्यांना पदावर राहण्यास अनर्ह ठरविले असून सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित केले आहे. यामुळे उर्मिला मडावी यांचे शौचालय व बाथरूमही गेले आणि सदस्यपदही गेले असल्याची परिसरात चर्चा आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos