विकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
शहरात माणुसकीला आणि वाहिनी - दिराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.  दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या करून  मृतदेहावर बलात्कार केला असून या प्रकरणी पोलिसांनी विकृत आरोपीला अटक केली आहे.
इंदोरात राहणारा चंद्रशेखर बिंड (२६ )  असे आरोपीचे नाव आहे. तो औषधांच्या दुकानात कामाला आहे. तर त्याच्या नात्यातील भाऊ हा ट्रकचालक आहे. तो पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि वडिलांसह नागपूरमध्येच राहत होता. दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखरचा भाऊ ट्रक घेऊन सातारा येथे गेला. तर त्याचे वडील गावी गेले होते. याचा फायदा घेत चंद्रशेखर बुधवारी दुपारी भावाच्या घरी गेला. भावाची पत्नी आणि चार वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. घरी गेल्यानंतर वहिनीने चंद्रशेखरला पाण्यासाठी विचारले. यावेळी त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने  त्याने वहिनीची गळा आवळून हत्या केली. हा प्रकार चार वर्षांच्या मुलीनेही पाहिला होता. म्हणून त्याने चिमुरडीचीही हत्या केली. यानंतर त्याने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि तिथून पळ काढला. 
संध्याकाळ झाली तरी घरातून आवाज येत नसल्याने स्थानिकांना संशय आला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उगडला असता हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनात गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृतदेहावर बलात्कार झाल्याचेही उघड झाले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. दिर चंद्रशेखरवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-11-30


Related Photos