महत्वाच्या बातम्या

 अंगणवाडी सेविकांचे मानधन १५०० रुपयांनी वाढ : मोबाईल आणि पेन्शन योजनेचाही मिळणार लाभ


- राज्य सरकारचे निर्णय 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात1500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय या सेविकांना मोबाईल देण्यात येईल. शिवाय त्यांना पेन्शन योजनेचा लाभही घेता येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

अंगणवाडी सेविकांनी विवीध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला यश आल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी अगंणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला होता. या संपात अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस सहभागी झाले होते. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन राज्यभरात पुकारण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याने प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला आहे.


अंगणवाडी सेविकांच्या मान्य झालेल्या मागण्या

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती किंवा मृत्युनंतरच्या लाभासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर

अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने 20 फेब्रुवारीपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामध्ये अंगणवाडी सेविका-मदतनीस सहभागी झाले होते. या संप काळात अंगणवाड्या बंद ठेवण्या आल्या होत्या. ज्यामुळे सहा वर्षांची बालके पोषण आहारापासून वंचित राहात होती. शिवाय गर्भवती मातांचे तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी उपक्रमांनाही फटका बसत होता. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच चर्चेची भूमिका घेतली आणि अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्या आणि मोठा प्रश्न सुटला. राज्य सरकारच्या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांनीही आनंद व्यक्त केला.

Facebook    Twitter      
  Print


News - Rajy | Posted : 2023-03-01
Related Photos