वीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक


- पत्रकार परिषदेतून दिली चार वर्षांतील वाटचालीची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली
: राज्यात  मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात   विजेशी संबंधित चारही कंपन्यांनी वीज धोरणात मोठा बदल  केला. महापारेषण सातत्याने सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणावर भर देत आहे. यामुळे ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी आज गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंत अरविंद भादीकर उपस्थित होते.
ऊर्जा विभागाच्या चार वर्षांतील वाटचालीची माहिती देण्यासाठी विश्वास पाठक यांनी आज गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेतली.  विजेशी संबंधित चारही कंपन्यांनी  ग्राहकांना योग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी धोरण निश्चित केले. पूर्वी कृषिपंपांची वीजमागणी १८ हजार मेगावॉट होती. आता ती २५ हजार मेगावॉट झाली आहे. राज्याच्या सर्वच भागात अखंडित वीजपुरवठा केला जात असून कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने ८ ते १० तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. ग्राहकांची संख्या   २ कोटी १५ लाखांवरुन २ कोटी ५० लाखांवर पोहचली आहे.  २२  ऑक्टोबरला ग्राहकांनीच आमची परीक्षा घेतली. अचानक २४ हजार ९०० मेगावॉट विजेची मागणी आली आणि कुठेही खंड न पाडत महावितरणने ती पूर्ण केली, असे  पाठक यांनी सांगितले.
 वीजनिर्मितीसाठी लागणार कोळसा पोहचवावा लागायचा. यामुळे अनेक अडचणी होत्या.   त्यात ऊर्जा विभागाने बदल करुन जवळचा कोळसा वापरण्यास सुरुवात केली. शिवाय थर्ड पार्टी डिमांड लावली. यामुळे खर्चात मोठी बचत झाली. महावितरणला साडेसहा रुपयांत मिळणारी वीज शेतकऱ्यांना दीड रुपये प्रतियुनिट या दराने द्यावी लागते. वीज वापरणारे ग्राहक ६० टक्के असून, एकूण विजेच्या ३५ टक्के वापर शेतीसाठी होतो. परंतु कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे, असे  पाठक यांनी सांगितले. 
राज्यात सौर  ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना दिवस शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना स्थानिक पातळीवर राबवित आहोत. कृषी वाहिनी योजनेंतर्गत दोन पायलट प्रोजेक्ट सुरु झाले आहेत.   नवे  सरकार सत्तेवर येताच आम्ही साडेचार लाख वीजजोडण्या दिल्या. २०१७ पर्यंत गडचिरोली व नंदूरबार जिल्ह्यांतील काही गावे वगळता उर्वरित सर्व ठिकाणी वीज पोहचविल्याचा दावा विश्वास पाठक यांनी केला. गडचिरोली जिल्ह्यातील ६५८ गावांमध्ये वीज जोडण्यात येईल. कृषी प्राबल्य असलेल्या २० जिल्ह्यांमध्ये २१८ तालुक्यात २ ते १० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-11-30






Related Photos