महत्वाच्या बातम्या

 अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांच्यासह अंबानी कुटुंबाच्या घरात बॉम्बची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : एका अज्ञाताने नागपूर पोलिसांना सेलिब्रिटींच्या घरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन केला आहे. यात अंबानी कुटुंब, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचा समावेश आहे. या धमकीच्या फोनमुळे एकच गहजब उडाला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये मंगळवारी एक फोन आला. फोन करणाऱ्याने असा दावा केला की, त्याला अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी या तिघांचेही बंगले बॉम्बने उडवून द्यायचे आहेत. हा दहशतवादी हल्ला करण्यासाठी २५ दहशतवादी मुंबईत पोहोचले आहेत, असे बोलून त्याने फोन ठेवून दिला.

या फोननंतर एकच गहजब उडाला. नागपूर पोलिसांनी त्वरित मुंबई पोलिसांशी संपर्क करून त्यांना या फोनविषयी माहिती दिले. मुंबई पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. दरम्यान, हा फोन कुणी केला होता, याचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच, कलाकार आणि अंबानीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos