अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  :
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  गडचिरोली जिल्ह्याच्या विविध प्रश्नांचा आढावा घेऊन विकास कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खासदार अशोक नेते आमदार डॉ. देवराव होळी, वन विभागाचे सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली येथील जिल्हा क्रीडांगणाचे काम करण्यास केंद्र सरकारची तत्वत: मान्यता मिळाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. चार्मोशी येथील क्रीडा संकूलाच्या जागेसाठी भूसंपादन करून हे काम ही वेगाने पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या. गोडवाणा विद्यापीठासाठीच्या जागेचा, चार्मोशी बस स्थानकाचे काम, यासइ इतर कामांचाही त्यांनी आढावा घेतला. येत्या ३ जानेवारी रोजी गडचिरोलीमध्ये यासर्व प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी बैठक आयोजित करण्यात येऊन कामातील अडथळे दूर करत सर्व विकासकामे मार्गी लावण्याबाबत त्यांनी वनसचिवांना सांगितले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-30


Related Photos