महत्वाच्या बातम्या

 ३ मार्चपर्यंत निरंतर पुनर्वसन शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : निरंतर पुनर्वसन शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ३ मार्चपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे आयोजन २७ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार विभागाचे संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेला विदर्भातील विशेष शिक्षकांचा सहभाग असून या पाच दिवसीय कार्यशाळेत विविध श्रवण तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. भिकाने यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सी.आर.सी. नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. अनुरूपा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता भूषण गावंडे, वेंकटेश बेलखोडे आणि शेलेंद्र धाबेकर यांनी सहकार्य केले.





  Print






News - Nagpur




Related Photos