महत्वाच्या बातम्या

 शिबिरात ७२४ रुग्णांची नि:शुल्क आरोग्य तपासणी


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  सावली : लोकसमग्रह समाज सेवा संस्था, बल्लारपूर संचालित सचा गडेरीया प्रकल्पा अंतर्गत क्रिस्त वन चर्च गोमणी व किसानवाडी चर्च कोपरली यांच्या संयुक्त विध्यामाने एस जे बी संघ, सेवाग्राम हॉस्पिटल, वर्धा यांच्या सहकार्याचे गोमणी व कोपरली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला अध्यक्ष फा. राजू , संचालक क्रिस्त वन चर्च गोमणी व फा. सबास्तीन संचालक, किसानवाडी चर्च कोपरेली, तर प्रमुख पाहुणे आदरणीय बिशप एफ्रेम निरीकुलम, बिशप ऑफ चांदा, धर्मप्रांत, फा. थॉमस पुलेशेरी, संचालक लोकसमग्रह संस्था, फा. मन्नू, सहसंचालक, लोकसमग्रह, डॉ.सि.स्वाती, एसजेबी, संघ, एम बी बी एस, एम डी, मानसोपचार,  तज्ञ सेवाग्राम हॉस्पिटल, वर्धा, तज्ञ व मार्गदर्शक, सी.सुधा, सिस्टर स्मिता, सिस्टररशमी, सिस्टर मंजुषा, सिस्टर कुसुम, सि.लीस्सी, भास्कर ठाकूर, समन्वय, सुरज वंगावार, सीएचओ, गोमणी, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी निसर्गाच्या अनियमत पणामुळे होणारे आजार, आरोग्य स्वच्छता व आजार होऊ नये, या करिता घ्यावयाची काळजी, लहान मुलाची काळजी, विविध मानसिक आजार आणि दारूचे व्यसन यावर मार्गदर्शन केले. या शिबिरा मध्ये बी.पी.शुगर, चर्मरोग लहान मुलांचे आजार, अस्तीरोग व इतर आजारावर मोफत तपासणी करण्यात आले व निदान झालेल्या आजारावर मोफत औषधे देण्यात आले. या शिबिरामध्ये ७२४ लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे सूत्रसंचालन, प्रस्थाविक भास्कर ठाकूर समन्वयक अधिकारी यांनी केले व आभार सुधाकर कांबळे, समाज सेवक, यांनी मानले. शिबीर यक्षस्वीते करिता निळकंठ माहुरकर, गोमणी सुरेखा कुमारे, चिनू चौधरी, दसरत कुळमेथे, कोपरेली समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले .





  Print






News - Chandrapur




Related Photos