मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास २५ वर्षांचा सश्रम कारावास, गडचिरोली जिल्हा न्यायालयाचा निकाल


- २५ हजारांचा दंडही ठोठावला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली : बळजबरीने नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र आर. शर्मा यांनी २५ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
देसाईगंज येथील घटना असून १२ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पिडीत मुलीची आई आठवडी बाजारात गेली होती. यावेळी आरोपीने मुलाला पेट्रोल आणण्यासाठी बाहेर पाठविले. यानंतर पिडीत मुलगी घरातील भांडे स्वच्छ करीत होती. आरोपीने तिला बाथरूममधून तिचा हात पकडून नेवून बळजबरीने नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. याबाबत पिडीतेने आई घरी आल्यानंतर माहिती दिली. पिडीत मुलगी आणि तिच्या आईने लागलीच देसाईगंज पोलिस ठाणे गाठून आरोपीविरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६, ३७७ भादंवी कलम ६ बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण करून न्यायालयाल दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून आरोपीस आज २९ नोव्हेंबर रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र शर्मा यांनी कलम ३७६ भादंवी नुसार १० वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड, कलम ३७७ भादंवी अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड तसेच कलम ६ नुसार १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सारीका गुरूकर यांनी केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम बघितले.
News - Gadchiroli | Posted : 2018-11-29