महत्वाच्या बातम्या

 इंदिरानगर येथील हेवी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत श्रीराम क्रिकेट संघ विजेता


- ओम गणेश स्पोर्टींग क्लब, इंदिरानगर उपविजेता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ओम गणेश स्पोर्टिंग क्लब गडचिरोली तथा स्व. स्वप्निल मुरलीधरराव म्हशाखेत्री यांच्या स्मृती प्रित्यर्थ इंदिरानगर येथील गोटूल भूमीच्या मैदानावर भव्य हेवी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २७ फेब्रुवारीला या क्रिकेट स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत श्रीराम क्रिकेट संघ रामपुरी वार्ड, गडचिरोलीने प्रथम क्रमांक पटकावला तर उपविजेता होण्याचा मान ओम गणेश स्पोर्टींग क्लब इंदिरानगरने मिळविला.

समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रूपराज वाकोडे होते. तर बक्षीस वितरक म्हणून पिपरे पेट्रोलियमचे संचालक अनुराग प्रमोद पिपरे, स्पर्धेचे प्रायोजक दिवाकर म्हशाखेत्री, किशोर चुधरी, पराग पोरेड्डीवार, बंडूजी कोवे, सचिन पोयाम, ओम गणेश स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष नितीन गेडाम, उपाध्यक्ष अजय नैताम, सचिव कुणाल टिकले, मार्गदर्शक दत्तू कापकर, संघटक सोनु सोमनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रुपराज वाकोडे व अनुराग पिपरे व प्रायोजकांच्या हस्ते विजेत्या संघाला ७५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व चषक तर उपविजेता संघाला ५५ हजार रुपयांचे पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.   

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ओम गणेश स्पोर्टिंग क्लब गडचिरोलीचे सदस्य पंकज फरकाडे सुजित मेश्राम स्वप्निल नैताम, राहुल चिचुवार, फिरोज पठाण, सरोज कावळे, जय कापकर, साई टिकले, गणेश नैताम, सोहेल कुरेशी, स्वराज कापकर, छोटू पठाण, शिवम कापकर, तुषार मडावी, अर्पण गेडाम, समीर कापकर, ओम कापकर, राहुल मंगर, अनुज गिराम, अक्षय टेपलवार, भूषण गावड, क्षितिज शिंपी इत्यादी सदस्यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos