महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक ‍ प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २ मार्च २०२३ रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजन करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या उपस्थित असणार असून‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने २ मार्च २०२३ रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  गोंडवाना विद्यापीठ गडचिरेाली, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos