महत्वाच्या बातम्या

 आंबेडकर वार्डमधील खून प्रकरणात पुन्हा चार आरोपींना अटक


- १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : शहरातील आंबेडकर वार्डातील आशिष मेश्राम नामक युवकाची हत्या करुन मृतदेह शहरातील भगतसिंह वार्डनजीकच्या नहरात फेकुन दिल्याची घटना उघडकीस आली होती याप्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशाल रेकडे, दुर्योधन गाधाडे (१८) शंकरपूर, संतोष मेश्राम (२२) रा. आंबेडकर वार्ड, निकेश अलोणे (२२) रा. कस्तुरबा वार्ड असे आरोपींची नावे आहेत. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल रेकडेला दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती तर पुन्हा तिघांना शुक्रवारी अटक करण्यात पोलीसांना यश आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारच्या रात्री आशिष मेश्राम याला फोन येताच पत्नीला पाच मिनीटात परत येतो असे सांगुण घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरा पर्यंत घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळच्या सुमारास आशिषचा मृतदेह भगतसिंह वार्ड तुकुम वार्डाजवळील नहरात मिळून आला. याप्रकरणी देसाईगंज पोलीसांनी पंचनामा करुन पुढील तपास केला असता दुसऱ्या दिवशी विशाल रेकडे यास अटक केली व इतर तिन आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos