महत्वाच्या बातम्या

 कुसुमाग्रज हे माणसातील माणुसकी जागृत करणारे साहित्यिक : प्रा. रमेश धोटे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : माणसाचे दु:ख माणसानेच निर्माण केले आहे, अशी कुसुमाग्रजांची श्रद्धा होती. माणसानेच माणुसकीची विटंबना आणि पायमल्ली चालवली आहे. असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी सामाजिक असंतोष प्रकट केला. विषमता आणि अन्याय-अत्याचारविरूद्ध टिका करून त्यांनी आपल्या मानवताप्रेरित आशावादी कवितांची आणि साहित्याची निर्मिती केली आणि ते माणसातील मानवतेच्या रंगात रंगून गेले. कुसुमाग्रज हे खरोखर माणसातील माणुसकी जागृत करणारे साहित्यिक होते, असे प्रतिपादन प्रा. रमेश धोटे यांनी केले. ते नूतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी भाषा व वाड्मय विद्यार्थी मंडळ आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बुरसटलेल्या विचारांना बगल देत त्यांनी साहित्यात नवी क्रांती घडवून आणली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मराठी भाषेतील या त्यांच्या योगदानामुळे २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयदेव देशमुख, प्रा. सुभाष एस. मेश्राम, प्रा. जयंतकुमार रामटेके, प्रा. संदीप ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मी अभ्यासलेले कुसुमाग्रज या विषयावर वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत एकूण दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक बी.ए.भाग-२ ची विद्यार्थिनी कु. प्रियंका शामकुमार ठाकरे तर द्वितीय क्रमांक बी.ए.भाग-1चा विशाल प्रकाश कराडे यांनी प्राप्त केला. 

प्रथम क्रमांक रूपये 501 आणि द्वितीय क्रमांक रुपये 301 विजेत्यांना पुरस्कार राशी म्हणून महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. रमेश धोटे यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सुभाष उपाते, प्रा. विश्वेश्वर बेहरे हे होते. याप्रसंगी प्रा. डॉ. जयदेव देशमुख, प्रा. सुभाष एस.‌ मेश्राम, प्रा. जयंतकुमार रामटेके यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप ढोरे, सूत्रसंचालन बी.ए.भाग- 2 ची विद्यार्थिनी कु. सेजल इंदुरकर यांनी केले. तर पाहुण्यांचे आभार बी.ए.भाग-2 ची विद्यार्थिनी कु. करिष्मा शिवणकर हिने मानले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, प्रा. डॉ. वैशाली इंदुरकर आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos