महत्वाच्या बातम्या

 वत्सलाबाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : डॉक्टर सी .व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाला. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते. १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांचे काका होते. त्यांना १९३१मध्ये चंद्रशेखर मर्यादे च्या शोधासाठी (चंद्रशेखर लिमिट) आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणू प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९३०) मिळाला. वर्ग नववी विद्यार्थी निशांत फाटले, लोकेश सरकार, ओम कोटकोंडावार सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नितीन कासार,पर्यवेक्षक किरण मांडवकर यांच्या उपस्थितीत विज्ञान शिक्षका गुलनाज शेख, सोनाली फोपसे, ज्ञानेश्वरी शेंडे यांनी जीवनचरित्त्रावर प्रकाश टाकला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश जवंजाळकर यांनी तर आभार पपिता बुल्ले यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos