महत्वाच्या बातम्या

 मनोबल सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : २६ फेब्रुवारी २०२३ ला जुना कोर्ट चामोर्शी येथे होप फॉऊडेशन सिरोंचा द्वारा मनोबल सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन सोहळा पार पडले. यावेळी उदघाटक म्हणून नगरपंचायत चामोर्शी चे नगराध्यक्षा जयश्री वायलालवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन हेमके मनोविकार तज गडचिरोली, तर अध्यक्ष म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील भीषक डॉ. आय. जी. नागदेवते तर प्रमुख अतिथी नगरपंचायत चामोर्शी चे उप नगराध्यक्ष लोमेश बुरांडे, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने, बालरोग तज डॉ. केतन तलमले, प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर,  होप फॉऊडेशन सिरोंचा चे संचालक नागेश मादेशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महादेव सदावर्ते, शारदा राईस मिलचे संचालक तपन दोषी, मुख्याध्यापक ओमप्रकाश साखरे, मुख्याध्यापिका सुलता गयाली, मुक्तीपथचे तालुका संघटक आंनद इंगळे, समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार, राजेंद्र अल्लीवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

होप फॉऊडेशन सिरोंचा चे संचालक नागेश मादेशी यांनी उपस्थित लोकांना, होप फॉऊडेशन सिरोंचाचे कार्याबद्दल माहिती देऊन मनोबल सल्ला व मार्गदर्शन केंद्र ही जिल्ह्यातील पहिला समुपदेशन केंद्र असून मनोबल समुपदेशन केंद्रा तर्फे मानसिक आजार समुपदेशन, कौटुंबिक समस्या समुपदेशन, ताण तणाव व्यवस्थापन समुपदेशन, किशोर वयीन समस्या, राग व्यवस्थापन समुपदेशन, लैंगिक समस्या समुपदेशन, रॅशनल इमोशनल बिहेवियर थेरपी, रिलॅक्ससेशन थेरपी इत्यादी समुपदेशन सेवा सुविधा उपलब्ध आहेत याबाबत माहिती दिले. यावेळी उदघाटक जयश्री वायालालवार यांनी उपस्थित लोकांना आपण जसे विचार करतो, तसा आपण घडत असतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे, कितीही अडचणी आले तरी त्याला हिमतीने तोंड दिले पाहिजे, असे उपस्थित लोकांना मार्गदर्शन करून होप फॉउंडेशन सिरोंचा चे कामाचे गौरव करून पुढील होप फॉऊडेशन सिरोंचा द्वारा संचालित असलेल्या मनोबल सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सचिन हेमके यांनी उपस्थित लोकांना मानसिक विकाकराचे प्रकार, कारणे, लक्षणे, आणि उपचार याबाबत सविस्तर माहिती दिले. यासोबत मानसिक आजाराबद्दल असलेली गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले. सोबतच मोबाईलचे व्यसन, आणि तंबाखू आणि इतर मादक द्रव्य सेवनाचे दुष्परिणाम, तसेच ताण निर्माण का होतो आणि त्याचे कारणे काय-काय आहेत? याबाबत मार्गदर्शन करून ताण तणाव नियंत्रण तंत्र बद्दल  मार्गदर्शन केले.

प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ग्रामीण रुग्णालय चामोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांनी उपस्थित लोकांना, शारीरिक आजार झाले तर लोक लगेच डॉक्टर कडे जाऊन उपचार करून घेतात पण मानसिक आजार झाले तर लोक मला काय म्हणतील किंवा लोक माझ्या बद्दल काय विचार करतील या विचाराने लोक मनोविकार तज कडे लवकर जात नाही. त्यामुळे मानसिक आजार वाढतो त्यामुळे ज्याप्रमाणे आपण शारीरिक स्वास्थ कडे लक्ष देतो अगदी त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ कडे लक्ष दिले पाहिजे. राग क्रोध, मोह माया पासून दूर राहून विवेकी जीवन जगले पाहिजे असे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.  हिराजी बनपूरकर यांनी पण मानसिक स्वास्थ चे महत्व सांगितले तर मुक्तीपथ चे तालुका संघटक आंनद इंगळे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम मार्गदर्शन केले. 

अध्यक्ष डॉ. आय. जी. नागदेवते यांनी उपस्थित लोकांना, वाढती स्पर्धा, विभक्त कुटूंब पद्धती, स्वतः साठी वेळ न देता नुसता यंत्रा सारखा काम करत राहिल्याने मनोविकार होताना दिसून येत आहे. त्यामुळे आपण कोणाची तुलना न करता जीवन जगले पाहिजे. जीवनात आपण किती करोड कमवले यापेक्षा आपण आतून किती समाधानी आहोत, आंनदी आहोत हे खूपच महत्वाचे आहे असे मार्गदर्शन केले. सध्या लहान लहान गोष्टी वरून समाजात वाढणारे कौटुंबिक कलह, मानसिक आजार, ताण तणाव यासाठी मनोबल सल्ला आणि मार्गदर्शन केंद्रासारखे समुपदेशन केंद्र अतिशय महत्वाचे भूमिका बजावत असतात असे मार्गदर्शन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos