महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : आठ तालुक्यामधील ग्रामपंचायतील सार्वत्रिक मतदान निवडणूकाचे अंदाजित टक्केवारी ७४.९४ टक्के


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुक्यात 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाची अंदाजित माहिती पुढीलप्रमाणे आहे. एटापल्ली तालुक्यात तीन मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 1089 असून 716 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 65.75 टक्के एवढी आहे.  देसाईगंतज तालुक्यात सहा मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 3218 असून 2528 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 78.56 टक्के एवढी आहे.

गडचिरोली तालुक्यात तीन मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 1862 असून 1553 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 83.40 टक्के एवढी आहे.

आरमोरी तालुक्यात तीन मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 1003 असून 856 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला  असून मतदानाची टक्केवारी 85.34 टक्के एवढी आहे.

भामरागड तालुक्यात बारा मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 4606 असून 2985 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 64.81 टक्के एवढी आहे.

धानोरा तालुक्यात नऊ मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 2347 असून 1861 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 79.29 टक्के एवढी आहे.

चामोर्शी तालुक्यात नऊ मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 7189 असून 5441 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 75.69 टक्के एवढी आहे.

अहेरी तालुक्यात सहा मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार 2685 असून 2046 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 76.20 टक्के एवढी आहे.

याप्रमाणे आठही तालुक्यात मतदान सकाळी 7.30 वा. पासून ते दुपारी 3.00 वा. पर्यंत झाले. एकत्रित अंदाजित आकडेवारी घेतली असता झालेले एकूण मतदार संख्या 23999 असून मतदारांनी मतदान केलेली संख्या 17986 एवढी आहे. तर  टक्केवारी 74.94  एवढी प्राप्त झालेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos