महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आणि स्टुडंट पोर्टलवर माहिती विसंगती : दुरुस्तीसाठी १० मार्चपर्यंत मुदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांची आधारकार्डवरील माहिती आणि स्टुडंट पोर्टलवरील माहिती यात विसंगती असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नोंद केलेले आधार अवैध ठरत आहे.

जुलै २०२२ पासून वारंवार सूचना देऊनही आधारविषयक नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील १५ दिवसांत म्हणजेच १० मार्चपर्यंत आधार नोंदी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा आधार आणि स्टुडंट पोर्टलवरील डेटा यात विसंगती आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्ती २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. जेणेकरून संच मान्यतेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नोंद होईल, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

वर्ष २०२२-२३ ची संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेच्या स्टुडंट पोर्टल या लॉगिनवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्यासाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांना कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच ज्या शाळा विद्यार्थ्यांची आधारविषयक नोंद करणार नाही, त्याबाबत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आधारविषयक नोंद का होत नाही, याची खात्री करावी, असे आदेश शिक्षण आयुक्तालयाने दिले आहेत.

शाळेत हवी आधारकार्डप्रमाणे नोंद

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची अचूक नोंद स्टुडंट पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये आधारप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांचे नाव असावे. तसेच शाळांना वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक मिळत नाही. याचाच अर्थ शाळेकडे आधार क्रमांक नसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सतत गैरहजर असणारे विद्यार्थी पटावर असण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारची चौकशी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos