वैरागड-करपळा मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक , दोन जण जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / ठाणेगाव : 
थ्रेशर घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघात  दुचाकीवरील दोनजण जागीच ठार झाल्याची घटना आज २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील वैरागड - करपळा मार्गावर  वैरागडपासून दीड  किमी अंतरावरील  घडली.
निलेश कनीराम उसेंडी (२८), गुरूदेव टेमसू सोनटक्के (२५) दोन्ही रा. कोरेगाव अशी जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.  प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमारास शेतातील धान चुरणे करून एमएच-३३ एफ-४६५४ क्रमांकाचा ट्रॅक्टर थ्रेशर घेवून वैरागडकडे जात होता. दरम्यान वडसावरून वैरागडे मार्गे एमएच-३५ एन-७११६ क्रमांकाच्या दुचाकीने निलेश उसेंडी व गुरूदेव सोनटक्के वैरागडमार्गे कोरेगावकडे जात होते. याचदरम्यान वैरागडपासून १.५ किमी अंतरावर ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील निलेश उसेंडी व गुरूदेव सोनटक्के जागीच ठार झाले.
धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅक्टरचे समोरील टायर तुडून पडले. अपघात घडताच वैरागड येथील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक परघने, पोलिस हवालदार हरडे, राणे घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमीका  कोरेगाव येथील नागरिकांनी घेतली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-28


Related Photos