गडचिरोली जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता ६ हजारांची लाच स्वीकारतांना सापडला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कंत्राटदाराचे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत केलेल्या जुन्या कामाचे देयक काढून देण्यासाठी सहा हजारांची लाच घेणारा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचा उपविभागीय अभियंता रमेश सोमाजी शेंडे (५२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठ्याची कामे केलेल्या कंत्राटदाराने जुने देयक पास करण्यासाठी शेंडे कडे गेला. २  टक्के मोबदला म्हणून शेंडे  याने सहा हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर  सोनापूर परिसरातील राजस्व संकुल परिसरात सापळा रचण्यात आला. पंचसाक्षीदारासमक्ष शेंडे याला लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील , अपर पोलिस अधीक्षक  राजेश दुध्धलवार , अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र नागरे, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात  पोलिस निरीक्षक रवि राजुलवार, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थु धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, महेश कुकूडकर, गणेश वासेकर, किशोर  ठाकूर, सुभाश सालोटकर, तुळशिदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तवाडे यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-28


Related Photos