महत्वाच्या बातम्या

 मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : येथील मोहसीनभई जव्हेरी महाविद्यालयात ग्रंथालय माहितीशास्त्र विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती शनिवारी वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने थोर पुरुषांच्या जीवनावरील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. सुनील चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नाजीम शेख, डॉ. कुशल लजियर उपस्थित होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन केले. याप्रसंगी अब्दुल कलाम रीडर क्लबची कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बुराडे तर आभार प्रा. जोया सय्यद यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. पंकज चौधरी, प्रा. कुणाल हिवसे, डॉ. चंद्रकांत शेंडे, डॉ. गौरव निवातें, प्रा. सत्यनारायण पुसाला, डॉ. टीसी इंगोले, प्रा. सचिन पत्रे, प्रा. सचिन लोणारे, प्रा. रामकृष्ण येरोजवार, सतीश कोलावार यानी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos