अनैतिक संबंधातून इसमाचा खून, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
मानलेल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवून तिला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून इसमाचा खून केल्यानंतर प्रेत जाळून टाकलेल्या आरोपीस तब्बल दीड महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे.  सुरज आत्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
प्राप्त माहितीनुसार २२ ऑक्टोबर २०१८  रोजी  नलिनी कदम, रा. गजानन नगर, वार्ड नं. १, वर्धा यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार  तीचा मुलगा  पुरुषोत्तम उर्फ गुड्डु बाबाराव कदम (३७)  ९ ऑक्टोबर  पासुन घरी आलेला नव्ह्ता . त्यावरुन   रामनगर पोलीस ठाण्यात तो  हरविल्याची नोंद करण्यात आली व  शोध  घेणे सुरु केले. 
 पोलीस अधीक्षक  यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून सुध्दा सदर इसमाचा समांतर शोध सुरु होता. सदर हरविलेल्या इसमाच्या  शोध मोहिम दरम्यान  गुड्डु कदम याचे  घराजवळील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते  व ९ ऑक्टोबर रोजी सदर महिला  माहेरी चंद्रपुर येथे गेल्याचे तसेच गुड्डु कदम हा सुध्दा तिच्या सोबत गेलाचे समजले. 
२७ नोव्हेबर  रोजी सदर महिलेस  चौकशीसाठी बोलाविण्यात आले.   सतत पाच तास चौकशी  करुन तिला विश्वासात घेवून विचारपूस करण्यात आली. तिने सांगितले की, गुड्डु व ती   ९ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरला सोबत गेले. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर त्यांना घेण्याकरीता महिलेच्या वडीलांच्या गाडीवरील चालक  सुरज रामभाउ आत्राम, रा. लालपेठ काॅलरी हा आला होता. त्यानंतर तो त्यांना घेवून  घरी गेला . तेथे संध्याकाळी जेवण केल्यानंतर सुरज आत्राम याने महिलेला घरी सोडुन दिले व तेथे दोघे सोबत राहीले. सकाळी सुरज यास महिलेने  गुडृडू कुठे आहे असे विचारले असता त्याने  सांगितले की, त्याला मी मारुन टाकले आहे, तु आता लक्ष देवू नको. त्यामुळे महिला  घाबरुन गेली व वर्धा येथे परत आली व घाबरुन जावून घडलेली घटना कुणासही सांगितली नाही. 
मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी   चंद्रपुर गाठले.  तेथे सुरज आत्राम यास ताब्यात घेवून त्याची कसुन चौकशी केली असता त्याने गुड्डू   याचा खुन केल्याचे कबुल केले. सुरज आत्राम याने सांगितले की,  ९ ऑक्टोबर  रोजी गुड्डू व मी घरी जेवण केल्यानंतर मानलेल्या  बहिणीला   तिचे घरी सोडुन दिले.  दोघे आरोपीच्या घरी झोपले.  त्यानंतर  ५.३०   वाजता सुरज ने  गुड्डू यास सुध्दा उठविले व गुड्डू यास आपल्याला दारु प्यायला जायचे आहे असे सांगुन बाजुच्या जंगलात घेवून गेला. तेथे  दोघांनीही दारु प्रश्न केली व त्यानंतर   मोटारसायकलच्या क्लचवायरने गुड्डू याचा गळा आवळुन दोन मोठे दगड टाकले व गुड्डूचा खुन केला. त्यानंतर बाजुच्या पंपावरुन १ लिटर पेट्रोल आणुन त्याचा मृतदेह जाळुन टाकला. 
गुड्डू व सुरज याची मानलेली बहिन सरिता नांदुरकर यांच्या सोबत अनैतिक संबंध होते.  तसेच गुड्डू हा तिला नेहमी मारहाण व शिवीगाळ करीता होता. तसेच अंदाजे दोन महिन्या अगोदर सुरज  वर्धा येथे गेला असता गुड्डू याने   वादविवाद करुन  अपमान केला होता. त्यामुळे मी त्याचा काटा काढायचा मनात ठरवून त्याचा खुन केला आहे, अशी कबुली सुरज ने दिली. 
 आरोपी सुरज आत्राम याचे सांगण्याप्रमाणे मृतक गुड्डू याचा जळालेला मृतदेह ताब्यात घेण्यात आला व घटनास्थळ  चंद्रपुर येथील असल्याने तेथे गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही करण्यात आली. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक पऱिश्रम करुन  सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला असुन पुढील तपास सुरु आहे.
      सदर कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली व सध्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक  निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक निलेश  ब्राम्हणे तसेच पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे,  आशिष मोरखडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व हजेरीत पोलीस पथकातील सफौ/नामदेव किटे, पोहवा/सलाम कुरेशी , नरेंद्र डहाके, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला , कुलदिप टांकसाळे, सचिन खैरकार, भुशण पुरी,  जोत्स्ना शेळके , संचाली मुंगूले  यांनी केली.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-28


Related Photos