शेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह धानाला ३ हजार ५०० रूपये हमीभाव, ढिवर समाजाला मामा तलाव, बोडीमधील मासेमारीचे पारंपारिक मालकी हक्क देण्यात यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्यात यावा, गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षत्रातील विविध गावांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेकडो आंदोलकांना अटक करून सुटका केली.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चनाताई चुधरी, गडचिरोली तालुका चिटणीस सुधाकर आभारे, श्रीधर मेश्राम, शामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  यावेळी विजया मेश्राम, पुष्पा चापले, सुनिता आलेवार, गीता बोबाटे, शेवंता नैताम, शिला टिकले, मालु नैताम, शेवंता भांडेकर, सुषमा मडावी, ज्योत्सना कुकूडकर, ललीता नैताम, छाया नैताम, ललीता मानकर, अनुसया भोयर, योगिता कोरेले, गीता मानकर, सुनिता पवार, पार्वती पवनकर, पुष्पा कोतवालीवाले, प्रियंका कुमरे, शोभा मेश्राम, क्षिसरसागर मानकर, लता नैताम, आशा बावणे, वसुंधरा कोडापे, योगिता भोयर, ऐश्वर्या बावणे, सुरेंद्र इष्टाम, आकाश आत्राम, अजीत नरोटे, गुरूदेव मडावी, कृष्णा मानकर, महेश गहाणे, गोविंदा कोडाप, नागोराव नंदेश्वर, चमरू कोटामी, योगेश चापले, विजय मेश्राम, गणेश आळेकर, जनार्धन चापले, विनोद मेश्राम, कवडू चापले, हेमंत मानकर, ज्ञानेश्वर निंबोळकर, नेताजी चापळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. 
नागपूर - गडचिरोली मार्गावर युवा कार्यकर्ते होमराज उपासे यांच्या नेतृत्वात पोर्ला येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चामोर्शी - मुल मार्गावर रमेश चौखुंडे , दुर्वास म्हशाखेत्री यांच्या नेतृत्वात भेंडाळा येथे सगणापूर, रामाळा, घारगाव, एकोडी, दोटकुली, भेंडाळा येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आष्टी येथे पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात विनायक आंदोलन करण्यात आले. आष्टी येथील मुख्य चौकात आष्टी - अहेरी, आष्टी - गोंडपिपरी, आष्टी - चामोर्शी मार्गावर वाहतूक रोखून चक्काजाम करण्यात आला. 
चामोर्शी येथील मुख्य मार्गावर हत्तीगेटसमोर शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रकाश सहारे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कुनघाडा रै. येथील बसस्थानकावर शेतकरी कामगार पक्षाचे गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, विठ्ठल दुधबळे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. गडचिरोली - चामोर्शी मार्गावर बैलबंड्या आडव्या लावून रस्ता अडविण्यात आला होता. शिवणी येथे गडचिरोली - चामोर्शी मार्गावर शेकापचे जिल्हा सहचिटणीस वसंत गावतुरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, शेकापचे सर्कल खजिनदार दत्तु चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. गुरवळा येथे गडचिरोली - पोटेगाव मार्गावर शेकापचे जिल्हा सदस्य प्रकाश मंटकवार, तालुका सदस्य चंद्रकांत भोयर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी ३ तास चक्काजाम करण्यात आला. 
विश्रामपूर येथे भिकारमौशी, मरेगाव, कळमटोला, बाम्हणी, आंबेटोला, उसेगाव, बोदली, मेंढा येथील नागरिकांनी सर्कल चिटणीस रोशन नरूले यांच्या नेतृत्वात धानोरा - गडचिरोली मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. जांभळी येथे चातगाव - कारवाफा सर्कल चिटणीस वसंत लोहट यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याशिवाय विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये आंदोलन करण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-28


Related Photos