महत्वाच्या बातम्या

 क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


- जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महोत्सवास सुरवात  

- १०० मीटर रनिंग स्पर्धेत राहुल पंचबुद्धे व मोनाली वांढरे प्रथम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे करण्यात आलेले नियोजन हे मिनी ऑलम्पिक दर्जाचे आहे. सर्व नगर परीषद मुख्याधिकारी व महानगरपालिका आयुक्त पुढाकार घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करत आहे ही आनंदाची बाब असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले.

महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान सैनिकी शाळा विसापूर येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधीर अडबाले, आयुक्त विपीन पालीवाल, बल्लारपुर मुख्याधिकारी विशाल वाघ, ब्रह्मपुरी मुख्याधिकारी अर्शिया शेख व इतर सर्व नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थीत होते.        

आपल्या देशात या जागतिक दर्जाच्या खेळाडूंची निर्मिती व्हावी यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रामध्ये उत्तम दर्जाचे फक्त तीन सिंथेटिक ट्रॅक आहेत ते फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी सर्व आधुनिक सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असुन खेळाडु अथवा कर्मचारी यांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. कार्यालयीन कामांमुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक स्वाथ्याकडे दुर्लक्ष होते. या महोत्सवाच्या आयोजनाने निश्चितच सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर रनिंग पुरुष स्पर्धेत प्रथम राहुल पंचबुद्धे तर महिलांमध्ये मोनाली वांढरे प्रथम क्रमांक प्राप्त केला तर राजुरा नगर परिषदेची प्रज्ञा धोटे द्वितीय ठरली. ४५ वर्षावरील १०० मीटर स्पर्धेत मनपाच्या बबिता उईके प्रथम व मनपाच्याच परिणय वासेकर द्वितीय विजेत्या ठरल्या. क्रिकेट सामन्यातील १६ संघांपैकी ४ संघ सेमीफायनल मधे पोहचले असुन उद्या अंतिम विजेता ठरणार आहे.

४०० मीटर रिले पुरुष प्रकारात मूल नगर परिषद प्रथम तर चंद्रपूर मनपा द्वितीय, ४०० मीटर रिले महिला प्रकारात राजुरा परिषद प्रथम तर भद्रावती द्वितीय ठरली असुन ४५ वर्षावरील १०० मीटर पुरुष स्पर्धेत मूल नगर परिषदेचे वसंत मोहुर्ले प्रथम तर राजेश चौधरी द्वितीय ठरले. याशिवाय व्हाॅलिबाॅल, टग ऑफ वॉर, कॅरम, बॅडमिंटन, चेस या स्पर्धा घेण्यात येत आहेत.‎  





  Print






News - Chandrapur




Related Photos