गोवर - रूबेला लसीकरणानंतर आठ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
जिल्ह्यात काल गोवर - रुबेला लसीकरण मोहिमेची थाटात सुरुवात करण्यात आली.  पहिल्याच दिवशी या लसीनंतर काही तासाने ८ विद्यार्थिनींना काही प्रमाणात त्रास झाला. यातील तिघींना जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ५ विद्यार्थिनींना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्या विद्यार्थिनींना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.
लसीकरणानंतर त्रास जाणवलेल्या विद्यार्थिनींपैकी २ विद्यार्थिनी खरांगणा शाळेतील, १ विद्यार्थिनी आंजीच्या शाळेतील, ५ विद्यार्थिनी हमदापूरच्या शाळेतील आहेत.  
 जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये ९ महिने ते १५ वर्षापर्यंत वयोगटातील सर्वांना रुबेला आणि ग्रोवर या २ आजारांपासून बचाव होण्यासाठी लस देण्यात आली. या लसीमुळे हमदापूर, आंजी मोठी तसेच खरांगणा शाळेतील काही विद्यार्थ्यांना घाबरल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन तर ५ विद्यार्थिनींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आठही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांना आता देखरेखीत ठेवण्यात आले आहे. त्यांची लवकरच सुट्टी होणार आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. 

लसीकरणानंतर नेमके काय घडले

लसीकरण केल्यानंतर २ ते ३ तासांनी आंजी तसेच खरांगणा शाळेतील तीन विद्यार्थिनींना मळमळ, श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला. या विद्यार्थिनीत आदर्श विद्यालय आंजी येथील निधी पाटील, खरांगणा येथील स्वावलंबी विद्यालयातील कल्याणी मसराम, प्राची पारिसे यांचा समावेश आहे. असाच त्रास हमदापूर शाळेतील ५ विद्यार्थिनींना  होत असल्याने त्यांना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-28


Related Photos