अभिनेता चिरंजीवीने प्रेक्षकांसोबत बघितला चित्रपट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अविरल फिल्म्स निर्मित ‘मी हनुमंता रिक्शावाला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट गडचिरोली येथील अलंकार सिनेप्लेक्स मध्ये सुरू असून आज २८ नोव्हेंबर रोजी चित्रपटाचे नायक चिरंजीवी गड्डमवार यांनी प्रेक्षकांसोबत सिनेमागृहात बसून चित्रपट बघितला. यामुळे प्रेक्षकांमध्येसुध्दा उत्साह दिसून येत होता. 
यावेळी विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार, शहर प्रतिनिधी अजय कुकडकर तसेच चित्रपटातील इतर कलावंतसुध्दा उपस्थित होते. चित्रपटात चिरंजीवी यांची मुख्य भूमिका आहे. त्यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्यांनी उत्तम भूमिका निभावली आहे. यासोबतच त्यांच्या आगामी चार चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. हे चित्रपटसुध्दा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॅंडमास्टर, राकोश, माहिरा या बाॅलिवूड चित्रपटांमध्येसुध्दा चिरंजीवीची भूमिका आहे. तसेच त्यांनी काही शाॅर्ट फिल्म्समध्ये सुध्दा भूमिका केली आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-28


Related Photos