महत्वाच्या बातम्या

 २६ फेब्रुवरी ला वंचित आघाडी कार्यकर्ता मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : वंचित बहुजन आघाडी व शहर महिला वंचित बहुजन आघाडी तर्फे उद्या २६ फेब्रुवरी ला भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

२६ फेब्रुवारी ला महात्मा ज्योतिबा फुले उर्दू, हिंदी, तेलगू शाळा येथे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता मेळावा भुषण फुसे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या अध्यक्षतेखालील सौ. कविता गौरकार महिला जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, रमेश लिंगमपल्लीवार जिल्हा उपाध्यक्ष, आनंद अंगलवार जिल्हा महासचिव, मधुकर उराडे जिल्हा महासचिव, सौ. अल्का मोटघरे जिल्हा महासचिव महिला आघाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन  करणार आहेत. 

या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ओम रायपूरे शहर अध्यक्ष, उमेश कडू शहर महासचिव तसेच पदाधिकारी  केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos