महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना

25 फेब्रुवारी 1510 : पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

25 फेब्रुवारी 1818 : ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

25 फेब्रुवारी 1935 : फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.

25 फेब्रुवारी 1945 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.

25 फेब्रुवारी 1945 : दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

25 फेब्रुवारी 1968 : मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे 11 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

25 फेब्रुवारी 1986 : जनआंदोलनाच्या रेट्यामुळे 20 वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

25 फेब्रुवारी 1996 : स्वर्गदारा तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

जन्म

25 फेब्रुवारी 1940 : बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑक्टोबर 1914)

25 फेब्रुवारी 1894 : आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू : 31जानेवारी 1969 – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)

25 फेब्रुवारी 1938 : भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.

25 फेब्रुवारी 1943 : बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू : 29 नोव्हेंबर 2001)

25 फेब्रुवारी 1948 : चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.

25 फेब्रुवारी 1974 : हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1993)

मृत्यू

25 फेब्रुवारी 1599 : संत एकनाथ यांचे निधन.

25 फेब्रुवारी 1924 : जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.

25 फेब्रुवारी 1964 : चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.

25 फेब्रुवारी 1978 : प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म : 29 जून 1891)

25 फेब्रुवारी 1980 : लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.

25 फेब्रुवारी 1999 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन. (जन्म : 19 एप्रिल 1912)

25 फेब्रुवारी 2001 : ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1908)

25 फेब्रुवारी 2016 : भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म : 12 डिसेंबर 1937)





  Print






News - todayspecialdays




Related Photos