मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब ?


वृत्तसंस्था / मुंबई :   मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारसींवर योग्य ती पक्रिया करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या  दोन दिवसात झालेल्या तीन बैठकानंतर उपसमितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं जावं या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.
 मागासवगर्गीय  आयोगाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली. या सगळ्या शिफारसी राज्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या आधी झालेल्या बैठकीत स्वीकराल्या अशीही माहिती समजते आहे. मात्र मराठा समजाला किती अरक्षण द्यायचं यासाठी द्यायचं यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. यानंतर आरक्षणासंदर्भातले विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-27


Related Photos