महत्वाच्या बातम्या

 स्वच्छता अभियानाला पुरते ग्रहण लागल्याने शहरात घाणीचे साम्राज्य


- देसाईगंज शहर युवक काँग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज स्वच्छता अभियानात मानांकन मिळवलेल्या नगर परिषदेने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी शहरवाशियांच्या घरातुन कचरा उचलण्यासाटी घंटागाड्या सुरु केल्या. मात्र मागील १० दिवसांपासून घंटागाड्या बंद करण्यात आल्याने टाकाऊ कचरा कुठेही टाकल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागल्याचे पाहू जाता सदर घंटागाड्या यथाशिघ्र सुरु करण्यात याव्यात,अन्यथा विरोधात कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देसाईगंज शहर युवक काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आल आहे. गडचिरोली जिल्ह्याची औद्योगिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज नगरपरिषदेला स्वच्छता अभियानाचे मानांकन मिळाले आहे. शहरात कुठेही टाकाऊ कचरा टाकल्या जाऊ नये यास्तव एका खाजगी कंत्राटदाराला १ कोटी ७ लाख रुपयाचा ६ महिन्याकरिता शहरवासियांच्या घरापर्यंत घंटागाड्या नेऊन कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. मात्र सदर कंत्राटदार हा बाहेरचा असल्याने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा वाजले असले तरी प्रशासकीय यंत्रणेकडून कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने संबंधित कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे. मागील १० दिवसांपासून शहरात घंटागाड्या फिरवणेच बंद करण्यात आल्याने येथील नागरीक ओला व सुका कचरा कुठेही टाकत असल्याने स्वच्छता अभियानाला पुरते ग्रहण लागल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरू लागले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता शहरात सुरू असलेल्या घंटागाड्या यथाशिघ्र पुर्ववत सुरू करण्यात येऊन कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यात यावी, अन्यथा विरोधात नगरपरिषद कार्यालयासमोरच ठिय्या निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारले असून समस्या तत्काळ मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी देसाईगंज शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पिंकू बावणे, तालुका युवक काँग्रेस महासचिव पंकज चहांदे, ज्येष्ठ नेते नरेंद्र गजपुरे, अनुसूचित जाती महिला काँग्रेस तालुका सचिव समिता नंदेश्वर, नरेश लिंगायत, सुनील चिंचोळकर, युवराज उईके, घनश्याम कोकोडे आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos