२८ नोव्हेंबरला चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर येथील पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवाकेंद्राचे उद्घाटन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते  २८ नोव्हेंबर  रोजी सकाळी ९ वाजता प्रधान डाकघर सिविल लाईन्स येथे होत आहे. या कार्यक्रमास राज्याचे अर्थ, नियोजन व वने तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 
 चंद्रपूर येथे पासपोर्ट सेवेचा स्वतंत्रा लाभ मिळण्याकरिता ना. हंसराज अहीर यांनी विशेष पुढाकार घेतल्याने चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित झाले असून जिल्हयातील नागरिकांना ही फार मोठी सुविधा असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहण्याचे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-27


Related Photos