इंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पोर्ला
: आरमोरीवरून गडचिरोलीकडे जात असलेल्या इंडिका कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९  वाजताच्या सुमारास घडली. 
नारायण देवाजी राउत (४५) रा. पोर्ला आणि रामचंद्र कस्तुरे (६५) रा. टेंभा अशी जखमींची नावे आहेत. राउत आणि कस्तुरे मोहझरीकडून पोर्लाकडे येत होते. दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने इंडिकाची दुचाकीला धडक बसली. जखमींना गडथ्चरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-27


Related Photos