महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर मनपात संत गाडगे बाबा महाराज जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेत २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे व सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली. याप्रसंगी बोलतांना सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी सांगीतले की, संत गाडगे बाबांना सामाजिक समरसता, स्वच्छता आणि समाजसुधारणा या गोष्टींमध्ये रस होता. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. संत गाडगे बाबा यांनी त्यांचे सर्व जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले होते.

संत गाडगे बाबा महाराज यांचे विचार हे नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरतात. संत गाडगे बाबांना स्वच्छतेची विशेष आवड होती, आज मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत शहराची स्वच्छता करण्यात येते तेव्हा जयंती दिनानिमित्त निमित्त मनपा सफाई कर्मचारी, संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटना यांनी रॅली काढुन स्वच्छता विभागातर्फे अनोख्या पद्धतीने नमन केले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos