महत्वाच्या बातम्या

 पोलीसांमुळेच वृद्ध निराधार महिलेस मिळाले तिच्या स्वप्नातील घर 


- पोलिसांनी स्वतःच्या मेहनतीने उभारले बुक्की दोगे बोगामी या वृद्ध महिलेचे घर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भामरागड : आधुनिक काळात देशात / राज्यात औद्योगिकीकरणानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून सर्व गोरगरिबांना किमान एक घर राहावयास मिळण्यासाठी सरकार तत्पर आहे. अशा कुटुंबांसाठी महाराष्ट्र एक परिवार एक घर २०२० योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या मालकीच्या घर असावे, हे प्रत्येक व्यक्तीचे अथवा कुटुंबाचे स्वप्न असते. सध्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्यामुळे एकर कमी घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थाचे जाळे मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. बँका, पतसंस्था आदी संस्था गृहकर्जे वितरीत करण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरीही कर्जाचे ओझे घेऊन दीर्घकाळ वाटचाल करणे अशक्यप्राय होऊन जाते. असे असले तरीही गडचिरोली सारख्या अति नक्षलग्रस्त अतिदुर्ग अति मागास भागात अद्यापही सरकार विविध अडचणीमुळे पोहोचू शकले नाही.

त्यामुळे अद्यापही काही बेघरांना घर मिळालेले नाही. लाहेरी सारख्या अतीदुर्गमध्ये नक्षल भागात जिथे निसर्गाचा नेहमी कोप होत असतो त्यामुळे ऊन ,वारा, थंडी येथे खूप अति प्रमाणात असते. त्यामुळे इथे बेघर लोकांचे जीवन असे होऊन जाते. लाहेरी गावामध्ये बऱ्याच दिवसापासून बुक्की बोगामी (वय 90 वर्ष) ही वृद्ध निराधार महिला तिच्या कच्च्या घरात राहावयास होती ज्यामुळे तीला ऊन, वारा , थंडी यापासून बचाव करता येत नसे व तिचे उतार वयातील जीवन खूप वेदनादायी झाले होते. याची दखल आता स्वतः लाहेरी पोलिसांनीच घेऊन पीडित/दुर्लक्षित/निराधार वृद्ध महिलेचा भार आपल्या खांद्यावर घेऊन तिला एक स्वतःच्या हक्काचे पक्के घर देण्याचा निर्धार केला व तो स्वतःच्या मेहनतीने पूर्णत्वास नेला आहे. तीला एक सक्षम जीवन, सन्मानाने जगण्यासाठी व निसर्गाशी तोंड देण्यासाठी पोलीसच तीच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

त्यानिमित्त २२ फेब्रुवारी २०२३ लाहेरी गावातील बोगामी चौक येथे वृद्ध निराधार महिला नामे बुक्की दोघे गोगामी हिच्या स्वप्नातील घराचे उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य ,जन नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उप पोस्टे लाहेरीचे प्रभारी अधिकारी भालेराव यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. त्यामध्ये त्यांनी गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी समाज प्रवर्तकांची समाजामध्ये गरज असल्याचे सांगतले. नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या विविध योजनांचे व त्याबाबत असलेले लाभ याबाबत सखोल मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा व बेघर गरजवंतांना पक्के घर देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

त्यामध्ये त्यांनी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत चालू करण्यात आलेल्या विविध योजने बाबत नागरिकांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक , आरोग्य , शैक्षणिक, सक्षमीकरण करण्याचे आश्वासित केले.त्यानंतर कार्यक्रमास हजर असलेले सचिन सरकटे आलेल्या सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार हे सुद्धा हजर होते. गरजूवंत पर्यंत आम्ही पोहोचतो आहोत याचे समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्घाटन समारंभास लाहेरी गावाचे सरपंच सौ. राजेश्वरी बोगामी, सदस्य गणेश गोटा, प्रतिष्ठित नागरिक बालू बोगामी, कोलू पुंगाटी ,राकेश आतलामी यांनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. व उप पोस्टे लाहेरी करत असलेल्या अविरत कार्यामुळे दुर्गम भागात गरजूवंताना लाभ मिळत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात अध्यक्षांच्या व प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांच्या हस्ते बुक्की दोगे बोगामी या वृद्ध महिलेच्या घराचे लाल फीत कापून उद्घाटन करण्यात आले. हजर असलेल्या सर्व नागरिकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा उप पोस्टे लाहेरीचे उपनिरीक्षक सचिन सरकटे यांनी सांभाळली. व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी आलेल्या महिलांचे, नागरिकांचे व प्रमुख पाहुण्यांचे व सदर घरासाठी अथक परिश्रम घेणारे राकेश आतलामी, कोलु पुंगाटी उप पोस्टे लाहेरी Psi संतोष काजळे, सचिन सरकटे, विजय सपकाळ जिल्हा पोलीसचे अंमलदार आदींनी सहकार्य केल्याने आभार मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos