आरोपी कडून तीन पोलिसांना बेदम मारहाण, एक पोलीस ठार


- मारेगांव तालुक्यातील घटना
तालुका प्रतिनिधी / मारेगांव : सन २०१४ च्या न्ययप्रविष्ट प्रकरणाचा समन्स घेऊन जाणाऱ्या तीन पोलिसाना संशायित आरोपीने काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर दोन पोलिस गंभीर जखमी झाल्याची घटना मारेगांव तालुक्यातील हिवरी येथे काल रविवार २५ नोव्हेंबर रोजी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिणाम पोलिसाची निर्घुन हत्या करणारा आरोपी पसार झाल्याने त्याला पकडण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मारेगांव तालुक्यातील हिवरी मधील संशायित आरोपी विलास लेतू मेश्राम याच्यावर घरात घुसुन मारहाण करण्याचा गुन्हा २०१४ मध्ये दाखल झाला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आरोपी न्यायालयात हजर होत नसल्याने त्याला समन्स बजावण्यात आला. मारेगांव येथील पोलिस राजु कुडमेथे (५२), प्रविण फुटले (३०) व मधूकर मुके हे तिघे संशायीत आरोपीच्या घरी समन्स घेऊन गेले असता पोलिसांसोबत शाब्दिक वाद घालुन कांहीं वेळात काठी आणली व राजू कुडमेथे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर बेदम मारहाण केली. यातच राजु कुडमेथे यांचा जागीच मृत्यू झाला तर जमादार मधुकर मुके यांच्यासह प्रमोद फुफरे यांनाही आरोपीने काठीने मारहाण करून जखमी केले . या मारहाणीत पोलिसांनी घटनास्थळा वरून काही अंतर गाठल्याने पुन्हा मोठी हानी टळली. राजु कुडमेथे यांची निर्घुन हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान जखमी पोलिसांवर मारेगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असुन या प्रकरणाने पोलिस वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
News - Rajy | Posted : 2018-11-26