महत्वाच्या बातम्या

 मुस्लिम अल्पसंख्याक ट्रस्टसाठी आवश्यक तेवढा निधी देणार : आमदार विनोद अग्रवाल



- मुस्लिम अल्पसंख्याक ट्रस्टच्या वतीने आयोजित इज्तेमाई विवाह सोहळ्यात आमदार विनोद अग्रवाल यांनी १८ विवाहित जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी दिले आशीर्वाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : मुस्लीम मायनॉरिटी ट्रस्ट गोंदियातर्फे इज्तेमाई शादीच्या 14 वर्षातील 18 जोडप्यांच्या निकाहाचे आयोजन गोंदिया शहरातील मरारटोली येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले. त्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सर्व उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, मुस्लीम अल्पसंख्याक ट्रस्टसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विवाह मंडप व इतर विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, आवश्यकतेनुसार निधी मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी वधू-वरांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच माणसाचे मोठेपण त्याच्या कर्माने घडते आणि मी सदैव समाजाच्या पाठीशी असून त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात मदत करण्यास तत्पर असेन असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजातील मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाऊन समाजाचा नावलौकिक मिळवावा, असे ते म्हणाले.

नागपूर शहरातील समाजसेवक जनाब प्यारे खान ज्यांना मुस्लिम अल्पसंख्याकांच्या या निकाह कार्यक्रमात ऑक्सिजन मॅन या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. ज्यांनी कोरोनाच्या गंभीर काळात संपूर्ण भारतात ऑक्सिजनचा मोफत पुरवठा केला. त्याचवेळी कार्यक्रमाला संबोधित करताना प्यारे खान म्हणाले की, सर्व धर्मांची समानतेने सेवा करणे हीच खरी सेवा असून शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाऊन नवा विक्रम निर्माण केला पाहिजे.

या कार्यक्रमामध्ये आ.विनोद अग्रवाल, निखिल पिंगले साहेब, (पुलिस अधीक्षक गोंदिया, प्यारे खान समाजसेवी नागपुर, घनश्याम पानतवने पूर्व गटनेता और सभापती बांधकाम गोंदिया जनाब हाजी एजाज, जनाब कादर शेख एजुकेशन ऑफिसर, डॉ.सचिन केलनका, डॉ.सैय्यद शाकिर अली, जितेंद्र (बंटी) पंचबुद्धे पूर्व नगरसेवक, जनाब खालिद पठान, मुस्लिम मायनारिटी ट्रस्ट अध्यक्ष, जनाब सैयद असलम अली, अहमद मनिहार, आबिद खान, जनाब अरशद लतीफ कुरेशी, जनाब मुस्ताक शेख आमगांव, जनाब असलम काजी, जनाब हाजी गुलाम कदिर खान, जनाब बशीर खान, इफ्तेखार गणी, सचिवमोहम्मद ईरफान काजी, जनाब बशीरुद्दीन कादरी, जनाब शादाब शेख, इस्तेमाई शादी कमेटी के अध्यक्ष जनाब अमीन तिगाला, सचिव शकील जाजम, हिरुद्दीन कादरी, सहीम कुरेशी, नईम खान बशीर खान, अब्दुल लतीफ खान, जनाब सलाउद्दीन तिगाला, मोहम्मद अनवर खान, हुसैन, नईम मिस्त्री, सैयद जाकिर अली, मकबूल, सबिल कुरैशी, सलमान, रज्जाक, कल्लू, मुनीर इत्यादी उपस्थित होते. तसेच मंच संचालन जनाब डॉ. साजीद खान द्वारे करण्यात आले व आभार प्रदर्शन जनाब मो इरफान यांचेद्वारे करण्यात आले.





  Print






News - Gondia




Related Photos