महत्वाच्या बातम्या

 काँग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाचा ब्रम्हपुरी क्षेत्रातील पारडगाव येथून शुभारंभ


- माजी मंत्री वडेट्टीवार यांचे नेतृत्व - अभियानाला जनतेतून उदंड प्रतिसाद 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथे करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान गावातील नागरिकांशी हातभेट घेऊन नागरिकांना हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वतः माहिती दिली.

अभियानांतर्गत पारडगाव व बेटाळा या दोन्ही गावात अभिया़नाचा शुभारंभ राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दोन्ही गावांत पदयात्रा काढण्यात आली. केंद्रातील भाजपा सरकारच्या अपयशांना वाचा फोडत, पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान नागरिकांना जो संदेश दिला तो संदेश आता या अभियानांतर्गत घरा घरात पोहचविण्यात येत आहे.

शेकडोच्या संख्येने पदयात्रेत शामिल होवून नागरिक सुद्धा अभियानाला साथ देत आहेत.

पदयात्रेत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष जगदीश आमले, माजी सरपंच राजेश पारधी, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा उपाध्यक्ष मुन्ना रामटेके, ज्ञानेश्वर मेश्राम, पारडगाव येथील सरपंच पिंटु पिल्लेवान, बेटाळा येथील सरपंच नरेंद्र ढोंगे, पारडगाव ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादाजी ढोरे, नामदेव ठेंगरी, मनीष गीरी, राजू ढोरे, गजानन वनस्कार, ब्रम्हदेव दिघोरे, पांडुरंग दिघोरे, माजी सरपंच विद्या मेश्राम यांसह गावातील बहुसंख्य नागरिक, काॅंग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos