नवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जूनी :
कोहमारा - नवेगाव बांध मार्गावर दुचाकीच्या अपघातात महिला ठार झाली असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.
कौशल्या चनाप (४८) रा. बानटोला असे मृतक महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आज २५  नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कोहमारा - नवेगाव बांध मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये कौशल्या चनाप हिचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी दुचाकी चालकाला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अज्ञात वाहनाचा अद्याप शोध लागला नसून दोघी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

   Print


News - Gondia | Posted : 2018-11-25


Related Photos