महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत, किर्तिवंत व्हावे : लक्ष्मणराव भोयर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / खाबांडा : विद्यार्थ्यांनी आयुष्यात व्यसन, व वाईट संगत यापासुन दुर राहुन ज्ञानवंत, किर्तीवंत व्हावे. शालेय जिवनात शिक्षण घेत असतांना शिक्षण हे वाघिणीचे दुध म्हणून प्राषण करावे. ज्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर संपुर्ण जगात किर्तीवंत झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजानी अठ्ठारापगड जातीला एकत्र करून स्वराज्य स्थापन केले, आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर केले. म्हणुनच त्यांच्या जंयती आपण साजरी करतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा सतत अभ्यासात मग्न राहुन समाजात एक आदर्श घडवून किर्तिंवंत व्हावे. वाईट गोष्टीच्या आहारी जावू नये, तबांखु, गुटखा व नशीले पदार्थ यापासून दूर रहावे, मोबाईल हाताळतांना त्यामधुन चांगल्या गोष्टी घ्याव्या. असे प्रतिपादन खाबांडा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोयर यांनी छत्रपती शिवाजी विद्यालय खाबाडा येथे शिवजयंती व वर्ग दहावीच्या विद्यार्थ्याला निरोप समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश बन होते. प्रमुख अतिथी म्हणून केद्रिंय विद्यालयाचे कुचनाचे सहायक शिक्षक उत्तम वाघ, डॉ.गौरव हिवरे, सतिश हुलके रेल्वे कर्मचारी, पालक प्रतिनिधि मनोहर खिरटकर, छत्रपती शिवाजी विद्यालय खाबांडाचे मुख्याध्यापक आर. डी. पारोधे प्रमुख पाहुणे विजय बालपांडे,  जेष्ठ शिक्षक धोटेसर प्रामुख्याने उपस्थित होते. आदर्श विद्यार्थि पवन राजकुमार येलगुंडे चा भेटवस्तू देवून शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. वर्ग ५ ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तसेच पालक वर्गानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला पालकवर्ग तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर खिरटकर सहायक शिक्षक  तर आभार मनोहर पारोधे सर यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos