ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन युवक ठार


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी  / वर्धा :
सिंदी रेल्वे येथील पोलीस ठाण्या  समोर काल  २४ नोव्हेंबर च्या रात्री ९.१५ दरम्यान भरधाव   मोटर सायकल व ट्रॅक्टर च्या सामोरा समोर झालेल्या धडकेत दुचाकी स्वार दोघेही ठार झाले.
 सविस्तर   माहितीनुसार बिना क्रमांक ची   मोटर सायकल चालक रोशन वासुदेवराव वलके ( २०) व  मागे बसलेला पवन दिलीप राव श्रीवास्तव (२३) दोन्ही रा. स्टेशन वार्ड सिंदी( रेल्वे ) , रेल्वे गेट कडून बस स्टँड कडे जात असताना समोरून ट्रॅक्टर क्रमांक एमएच  ३२  ए  ८५८०  ने  पोलीस स्टेशन समोर धडक झाली.  या अपघातात  मोटर सायकल स्वार दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारा साठी वर्धा येथे  नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.  फिर्यादी पो ह जावेद धामिया  यांच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रॅक्टर चालक संतोष सुखराम दाते रा.  पळसगाव रोड सिंदी याला अटक करण्यात आली आहे . आरोपी   विरोधात ३०४  (अ)  भा द वि सह कलम १८४, १३४  अ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास सुरू आहे.   Print


News - Wardha | Posted : 2018-11-25


Related Photos