महत्वाच्या बातम्या

 पट्टेदार वाघाच्या झुंजीत बिबट ठार : सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील मरेगाव बिटातील खैरी, ( पवनपार्) या ०१ की. मी. अंतरावर बिबट आणि पट्टेदार वाघाच्या झुंजीत  बिबट ठार झाल्याची घटना काल रात्रौच्या सुमारास घडली असी माहिती मिळाली आहे.

घटना घडल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनाक्रमाची शहानिशा केली.

प्राप्त माहिती नुसार, पट्टेदार वाघ व बिबट यांच्यात जोरदार झुंज होऊन बिबट्याचा जागीच मुत्यू झाल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे. त्यावेळी सहाय्य्क उपवनसंरक्षक चोपडे, वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर, क्षेत्रसहाय्यक बुरांडे, वनरक्षक व्ही. बी. सोरते, वनरक्षक सोरते, वनरक्षक येरमे व वनरक्षक राठोड यांच्या उपस्थितीत मोक्का पंचनामा करून बिबट्याचा शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

या उपवनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघांचे बस्तान असून जंगलामध्ये वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच या भागातील गावांना जोडणारा मार्ग जंगलव्याप्त असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या मार्गाने प्रवास करतांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos