महत्वाच्या बातम्या

 शाळा व आठवडी बाजाराच्या समस्येबाबत आम आदमी पार्टीचे अपना हक धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील शाळा व आठवडी बाजाराचा प्रश्न सक्रिय भूमिकेने सोडवावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पप्पुलवार यांच्या नेतृत्वाखाली 22 फेब्रुवारी 2023 रोजी बल्लारपूर नगरपरिषद चौकात अपना हक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  

नगरपरिषदेचे नूतनीकरणाचे काम थांबवून नगर परिषद शाळा मध्ये सोई सुविधा उपलब्ध कराव्यात, नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांच्या समस्या सोडवण्यात यावे, काही वर्षांपूर्वी नवनिर्माणच्या नावाने दुसऱ्या शाळेत स्थलांतरित केलेली शाळा त्याच ठिकाणी सुरू करण्याची मागणी केली आहे. 

आठवडी बाजार जुन्या जागेवरच भरविण्यात यावे.

या तिन्ही विषयांवर आंदोलनाच्या दिवशी मुख्याधिकार्‍यांकडून आम्हाला त्या ठिकाणी लिखित पत्र न मिळाल्यास त्याच दिवसापासून आमच्या आंदोलनाचे रुपांतर साखळी उपोषणात होऊन तीव्र करण्याचे इशारा आम आदमी पार्टी द्वारे देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, सचिव ज्योती बाबरे, जिल्हा संघटक प्रा. नागेश गांडलेवार, महिला संघटनेच्या किरण खन्ना, युवा सचिव रोहित जंगमवार, सहसंपर्कप्रमुख आशिष गेडाम, अफजल अली, सुधाकर गेडाम आदी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos