कर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बंगळुरू :
कर्नाटकातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे.  
प्राप्त माहितीनुसार, मांड्या जिल्ह्यातील कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात शनिवारी एक खासगी बस कोसळली. या भीषण अपघातात २५हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे .   Print


News - World | Posted : 2018-11-24


Related Photos