मासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर


- मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली
- ग्रा.प. सचिव व पदाधिकारी सुस्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
 तालुका प्रतिनिधी / चिमुर :
१९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला . यावर्षी जिल्हात गावागावात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. मात्र मासळ- मदनापूर जि.प. क्षेत्रातील एकही ग्रामपंचायत  कार्यालयात जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला नाही . त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखवली . 
प्रत्येक गाव हा शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासना मार्फत विविध योजनेतुन ग्रामस्थरावर योजना देत असता मात्र ग्राम स्तरावरून सचिव , सरपंच यांच्या दुर्लक्षतेमुळे ग्रामस्थांना योजनेपासुन मुकावे लागतो. 
  जिल्हातील गावागावात जागतिक शौचालय दिनाच्या ग्राम स्थरावर आयोजन करायचे यामध्ये गृहभेट, सभा, लोककलावंत कार्यक्रम , स्वच्छता फेरी, मार्गदर्शन सभा, इत्यादी कार्यक्रमघेण्याचे  आदेश असतानी सुध्दा मासळ मदनापूर जि.प.क्षेत्रात  ग्राम स्थरावरुण कुटल्याही प्रकारची अमलबजावनी झालेली नाही.  त्यामुळे ग्रामस्थ विविध योजनेच्या माहितीपासून वंचित आहेत . या विविध योजनेचा लाभ फक्त राजकिय पुढाऱ्यांनाच  होत असल्याची चर्चा केली जाते. 
    Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-24


Related Photos