सास्ती, पवनी, बल्लारपूर, कोळसा ई - ऑक्शन मधील भ्रष्टाचार विधानसभेत


- प्रकरणे त्वरित निकाली काढून कारवाई करण्याची आमदार अॅड. संजय धोटे यांची  मागणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा
:  वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, पोवणी,आणि बल्लारपूर कोळसा खाणीत होत असलेल्या ई - ऑक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात अनियममता असल्याची बाब पुढे येत आहे.  क्रॅश कोळशाचा भाव देऊन उत्तम दर्जाचा कोळसा दिल्या जात असल्याची माहिती आहे.  तीन कोळसा खाणीतून निघणारा कोळसा क्रॅश डी ग्रेटचा असून याचा दर १ हजार ३०० ते १ हजार चारशे असताना क्रॅश कोल ऐवजी ए ग्रेडचा कोल उचलून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे समजते ते खरे आहे काय,असा प्रश्न खनिकर्म मंत्र्यांना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विचारला  आहे.
 निम्र पैनगंगा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील खरेदी - विक्रीचे निर्बंध उठवावे, शासनाच्या १५ जानेवारी २०१८ नुसार यवतमाळ जिल्ह्यातील निर्बंध  उठविण्यात आले. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा,कोरपना,तालुक्यातील निर्बंध  उठविण्यात आलेले नाही.  या भागात निर्बंध  लावल्यामुळे शेतजमीन विक्री करणे शक्य होत नाही.  राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील शेतजमिनिवरील सात - बारा वर वर्ग दोनची नोंद असल्याने  शेकडो प्रकरणे महसूल विभागाकडे पडलेली आहे.  ही प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची मागणीही आमदार अॅड. संजय धोटे यांनी केलेली आहे.
 वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, धीडशी, या गावलागतच्या गावांना वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे घरांना, इमारतीला शाळेच्या इमारतीला तळे जाउन जीवितहानी होऊ शकते. यामुळे वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आलेली आहे.

आदर्श ग्राम निवडीत निकष डावलले 

राज्य व केंद्र शासनाच्या पुरस्कृत आदर्श ग्रामची निवड करताना कोरपना तालुक्यात मूल्यमापन असलेल्या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.
गावाची निवड करताना घनकचरा व्यवस्थापन,वनीकरण, सांडपाणी व्यवस्थापन,जलस्वच्छता,संत गाडगेबाबा अभियानांतर्गत केलेले कार्य असणे गरजेचे असताना निकषाला डावलून निवड केलेल्या ग्रामपंचायतीची निवड कशी करण्यात आली.हा प्रश्न आमदार अॅड. संजय धोटे यांनी विचारला आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-23


Related Photos