महत्वाच्या बातम्या

 पोलीस स्टेशन भामरागड येथे शिवाजी महाराज जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत व स्फुर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पोलीस स्टेशन भामरागड येथे साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रमाला पोलीस स्टेशन भामरागड येथील पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी कुमारसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक संकेत नरोटी, पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, रमेशसिंग, डेप्युटी कमांडट, सीआरपीफ, पोलीस उपनिरीक्षक पाटील, एसआरआपीफ व जिल्हा पोलीस अंमलदार, सीआरपीफचे अंमलदार, सीआरपीफचे अंमलदार, उपस्थित होते. 

कुमारसिंग राठोड यांनी शिवाजी महाराज याच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलीत करून मानवंदना दिली. व सर्वाना शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाला उपस्थित कुमारसिंग राठोड व उपस्थित सर्व अधिकारी अंमलदार यांनी शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याविषयी व त्यांच्या जीवनचारित्र्यावर माहिती दिली. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos