विजेच्या धक्क्याने विज सहाय्यकाचा मृत्यू, महाविरणच्या लेखी आश्वासनानंतरच प्रेत घेतले ताब्यात


- कुटूंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
तालुक्यातील रावनवाडी येथील राहुल भिमराव सहारे हा विद्युत सहाय्यक म्हणून ब्रम्हपुरी येथे कार्यरत होता. दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी त्याला विद्युत शाॅक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. कुटूंबीयांनी नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. महावितरणच्या आश्वासनानंतर अखेर प्रेत ताब्यात घेण्यात आले. राहुलवर स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
राहुल सहारे हा विज वितरण केंद्र ब्रम्हपुरी शहर येथे कार्यरत होता. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास विज दुरूस्तीचे काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मृतक राहुलच्या नातेवाईकांनी कुटूंबातील एका सदस्यास नोकरी तसेच इतर लाभ देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी कंपनीच्या नियमाप्रमाणे व शैक्षणिक पात्रतेनुसार वारसदारास नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले. यावेळी धनंजय तिरपुडे, रवी नाकाडे, गौरव नागपूरकर उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-23


Related Photos