महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा व्यसनमुक्तीचा निर्धार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील शाळा, शासकीय कार्यालये तसेच अन्य ठिकाणी दारू व तंबाखूचे दुष्परिणाम सांगून दारू व तंबाखू सेवनविरोधी जागृती आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने करण्यात आली. व्यसनमुक्ती सप्ताहनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग पुरस्कृत आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने व्यसनमुक्तीबाबत जागृती करण्यात आली. बोडधा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला सरपंच भाग्यश्री गायकवाड, उपसरपंच राजेंद्र गायकवाड, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिनेश साखरे, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक पंकज लाडे, सपना लाडे व नागरिक उपस्थित होते. नवीन लाडज येथील कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य श्रीराम भोयर, स्वप्निल शेंडे, शुभम कराडे, अविनाश नाकाडे, अक्षय पाटील संतोष मेश्राम, शेषराव पिलारे उपस्थित होते. देसाईगंज येथील महात्मा गांधी विद्यालय व आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात व्यसनमुक्ती सप्ताहनिमित्त शपथ घेण्यात आली. सावंगी येथील महिला व बचत गटातील सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात व्यसनमुक्ती सप्ताहनिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

व्यसनमुक्ती साहित्य प्रदर्शन करून लोकांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी स्टेशन मास्टर रितेश कुमार, पोलीस उपनिरीक्षक विजय भालेकर, शेषराव भेंडे, प्रफुल्ल तिरपुडे, जितेंद्र राऊत, अमोल वाढवे, प्रीती फुले, उषा सहारे तसेच प्रवासी उपस्थित होते. प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, सहायक आयुक्त अमोल यावलीकर, निरीक्षक नीलेश तोरे, व्यसनमुक्ती विभागाचे नरेश नायक यांच्या मार्गदर्शनात डॉ. सूर्यप्रकाश. गभने, आरती पुराम, प्रीतेश जांभुळकर यांनी व्यसनमुक्ती सप्ताह यशस्वी पार पाडला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos