विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
शहरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या विसापूर येथील  जिल्हा परिषद शाळेतील स्टोर रूम मध्ये ठेवलेली शालेय पोषण आहारातील तांदूळ, सोयाबीन तेल, डाळ इ. खाद्य वस्तू चोरीला अज्ञात चोरट्यांनी लांबवीले . चोरीला गेलेल्या मालाची किंमत अंदाजे ६ हजार ७२५ रुपये असून याबाबत जिल्हा परिषद हायस्कुल विसापूर शाळेचे मुख्याद्यापक मोरेश्वर पाटील यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे  तक्रार नोंदविली. 
महाराष्ट्र राज्य सरकार ने अंतोदय ,बीपीएल, एपीएल, धारकांना २ रु, ३रु, किलो प्रमाणे ३५ कि. स्वस्त धान्य देण्याचे नियम असतांनाही शालेय पोषण आहाराचे धान्य चोरी करणे हि लाजिरवाणी बाब आहे. घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-23


Related Photos